बऱ्याच वर्शानंतर कुलकर्ण्यांची नवीन पिढी आजोबांनी बांधलेल्या गावाबाहेरच्या जुनाट वाड्यावर जमली होती. इथे मंद प्रकाशांत मंद संगीताच्या धुंद वातावरणात पत्त्यांचा डाव रंगला होता. मद्याच्या बाटल्यांची बुचं उघडली जात होती. गप्पा विनोदांना ऊत आला होता. बारा साडेबाराच्या सुमारास दारावर टक टक ऐकू आली. "एवढ्या रात्री कोण आलंय मरायला " पुटपुटत संजय उठला अन चार पावलं अडखळत चालून दरवाजा उघडला. दरवाजात कोणीच नव्हतं . संजय पडवीत जाऊन डोकावून आला. पण त्याला कुणीच दिसलं नाही. "बहुतेक भास झाला असावा." म्हणत त्याने दरवाजा बंद केला अन पुन्हा स्वप्नवत विश्वात सामील झाला. थोड्या वेळाने दारावर पुन्हा टक टक आली. "कोण उगाच सतावतंय " म्हणत विकास उठला अन दरवाजा उघडून पडवीत आला. पण त्याला देखील कुणीच दिसलं नाही. दार बंद करून तो आपल्या जागी बसला. काही वेळाने दारावर पुन्हा टक टक. "हे काय चाललंय? भूत तर नाही ना?" धनंजय बोलला. पण त्यामुळे सगळेजण खाडकन भूतलावर आले. सगळ्यांच्या अंगावर भीतीने कांटा आला. कांहीजण तर थरथर कापायला लागले. रामरक्षा तोंडावर आली.
अन तिथे पडवीतील कोनाड्याच्या दारावर एक पाल आपल्या तोंडाच्या आकारापेक्षा मोठं असलेलं झुरळ पकडून ते खाण्याच्या प्रयत्नात आपली शेपटी जोरजोरात दारावर आपटत होती टक टक टक .
अन तिथे पडवीतील कोनाड्याच्या दारावर एक पाल आपल्या तोंडाच्या आकारापेक्षा मोठं असलेलं झुरळ पकडून ते खाण्याच्या प्रयत्नात आपली शेपटी जोरजोरात दारावर आपटत होती टक टक टक .
No comments:
Post a Comment